आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

कार्ला लोणावळा येथील श्री एकविरा मंदिरात १० जानेवारीस महाआरतीचे आयोजन

मुंबई :आगरी -कोळी -मच्छिमार व इतर समाजाची कुलस्वामिनी कार्ला निवासिनी आई एकविरा देवी मंदिर व परिसर अनेक दशकांपासून विकास कामांपासून तसेच एकविरा भक्त -भाविकांना सुख सुविधांपासून वंचित राहिलेला आहे . श्री एकविरा गड व कार्ला लेणी परिसराला वैभव प्राप्त व्हावे तसेच पर्यटन व्यवसायाला त्वरित प्राधान्य मिळावे , मंदिराच्या मूळ बांधकामाविषयी तसेच  पुरातत्व अस्तित्वासंदर्भात त्वरित सर्व पुरावे गोळा करून त्या पुराव्यांच्या आधारे नव्याने मंदिराची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी या व इतर मागण्यांकरिता शासनाने लक्ष वेधण्यासाठी आगरी -कोळी समाज व समस्त एकविरा भक्त -भाविकांच्या वतीने कार्ला लोणावळा येथील श्री एकविरा देवी मंदिरात सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता महाआरती आयोजित करण्यात आली आहे . या आरतीस आगरी सेना प्रमुख राजारामजी  साळवी साहेब , आगरी सेना नेते प्रदीपभाऊ साळवी साहेब,  आगरी युवा सेना प्रमुख राहुलजी साळवी साहेब यांना तसेच सर्व जिल्हाप्रमुख यांना निमंत्रित केल्याचे मुंबई प्रदेश आगरी सेना अध्यक्ष जयेंद्रदादा खुणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संकल्प संस्थेच्या वतीने पॅरा कौन्सिलिंग कोर्सचा शुभारंभ ; मानसिक आरोग्य क्षेत्रासाठी प्रशिक्षित समुपदेशक घडविण्याचा संकल्प

मुंबई दि. २२ (अधिराज्य) वाढत्या मानसिक तणाव, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित समुपदेशकांची गरज ओ...