उरण - उरण तालुक्यातील समाज कार्यात अग्रसेन असणारी चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगडचे संस्थापक -अध्यक्ष विकास कडू यांचे वडील कै.शांताराम पांडुरंग कडू (वय -70)करळ -उरण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते आजू बाजूच्या गावात सर्वांच्या सुखात-दुःखात नेहमी आपले योगदान देत असत. त्यामुळे त्यांची कमी आत्ता आजू बाजूच्या गावात नेहमी जाणवत आहे. ते करळ ग्रामस्थ मंडळाचे माजी खजिनदार होते.ते प्रेमळ, मितभाषी, मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने कडू परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण करळ गाव व आजू बाजूच्या गावात शोककळा पसरली आहे.पत्नी, 2 मुले,2 सुना, 1 मुलगी,1जावई, 5 नातवंडे असा त्यांचा कुटुंब परिवार आहे.उरण तालुक्यातील चाईल्ड केअर सामाजीक संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विकास कडू सामाजिक कार्यकर्ते यांचे ते वडील होते. करळ,सावरखार,सोनेरी, जसखार गावातले ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी , ग्रामस्थ, नातेवाईक यांच्या उपस्थितीत करळ ग्रामपंचायत येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा