उरण : मच्छिमार सहकारी सोसायटी कार्यालय करंजा येथे आरोग्य विभाग उरण, पालवी हॉस्पिटल उरण व करंजा मच्छिमार सोसायटी यांच्या सहकार्याने विशेष क्षयरोग निदान शिबीर व आरोग्य तपासणी अणि कोविड लसीकरण यांचे आयोजन करण्यात आले. यावेळी करंजा मच्छिमार सोसायटी चे चेअरमन भालचंद्र कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ इटकरे , वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय उरण चे डॉ. धनगावे , पालवी हॉस्पिटल चे डॉ अजय लहासे, डॉ प्राजक्ता पाटील, व स्टाफ, डॉ. अजय कोळी, डॉ. कोळी, डॉ. पुजारी (आर. बि. एस. के.) उपस्थित होते.
याप्रसंगी वरीष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक रतिश पाटील यांनी उपस्थितांना क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती दिली. दीपक धुमाळ- वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समाजामध्ये विविध आजाराबाबत जनजागृती व्हावी याकरिता सदर कार्यक्रमात क्षयरोग, कुष्ठरोग, एच. आय. व्ही. या आजारांची माहिती पत्रके उपस्थित लोकांना वाटण्यात आली. तसेच कोविड - 19 चे पाहिल्या व दुसर्या डोस चे लसीकरण करण्यात आले. यासाठी आरोग्य सेवक पेडणेकर, कोळी, आरोग्य सेविका श्रीमती थळे, श्रीमती केणी सिस्टर यांचे सहकार्य मिळाले. औषधे वाटप करण्या करीता फार्मासिस्ट श्रीमती माने- जासई, समुपदेशक महादेव पवार, कुष्ठरोग तंत्रज्ञ देसले यांनी मोलाची साथ दिली. तसेच चाणजे उपकेंद्र च्या सर्व आशा कार्यकर्ती यांनी अॅण्टीजेन टेस्ट करण्यासाठी उत्तम सहकार्य केले.
कार्यक्रमा मध्ये एकूण 124 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 107 रुग्णांना कोविडचे लस देण्यात आली. 19 संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा