आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

“मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" निमित्ताने शोभा सावंत आणि रमेश धनावडे आयोजित "अभिवाचन" कार्यक्रम संपन्न

अलिबाग(जिमाका):- शासनाने दि.14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 हा कालावधी 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करण्याचे नियोजन केले आहे. आज 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्ताने  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोभा सावंत आणि रमेश धनावडे आयोजित "अभिवाचन" या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

     या अभिवाचन कार्यक्रमासाठी महाड तहसिलदार सुरेश काशिद, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शोभा सावंत, रमेश धनावडे व मकरंद बारटक्के तसेच साहित्य संपदाचे वैभव धनावडे व  राज्यातील विविध भागातून स्पर्धक व अभिवाचन प्रेमी हे ऑनलाईन उपस्थित होते.

      यावेळी तहसिलदार सुरेश काशिद यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रम संयोजक शोभा सावंत यांनी अभिवाचन बाबत थोडक्यात माहिती दिली व कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. 

      कार्यक्रम संयोजक रमेश धनावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून मराठी भाषेचा जागर करीत असून तिचे संवर्धन करणे आपणा सगळ्यांचेच कर्तव्य आहे व त्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे, असे सांगितले.     

     कार्यक्रमाची सुरुवात रमेश धनावडे यांनी 'जगावं की मरावं' या नटसम्राट नाटकामधील अभिवाचनाने केली. संपूर्ण जिल्ह्यामधून या कार्यक्रमासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला.  

सुधीर शेठ, आशिर्वाद मराठे, मानसी मराठे, राजन पांचाळ, संध्या पोटफोडे, राकेश मेहता 

गंगाधर साळवी, अर्चना भागवत, रश्मी जंगम, विद्या देसाई, उषा खोपडे, स्मिता पवार, कांचन शेठ, अनुया आपटे, किसन पेडणेकर, डॉ. सुवर्णा पाटील, विजय पराडकर, मयूर पालकर, वैभव धनावडे इत्यादी कलाकारांनी वेगवेगळ्या विषयांवरील आपले अभिवाचन बहारदारपणे  सादर केले.

    या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, महाड तहसिलदार सुरेश काशिद व जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी समन्वय साधला तर तांत्रिक साहाय्य श्री.शार्दूल भोईर यांनी केले.

    कार्यक्रमाच्या शेवटी श्री.रमेश धनावडे यांनी आभार प्रदर्शन करतेवेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा प्रशासन आणि हा अभिवाचन कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन 'साहित्य संपदा' संस्थापक वैभव धनावडे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव पूर्व येथे जागतिक योग दिन उत्साहात संपन्न!

मुंबई : दर वर्षी २१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात "जागतिक योग दिन " म्हणून जगभरात साजरा केला जातो.       गोरेगाव पूर्व ये...