आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

उरणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

उरण (विठ्ठल ममताबादे)- कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उरण महाविद्यालय, लायन्स क्लब उरण, मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्था उरण, माजी विद्यार्थी संघ, टायगर ग्रुप उरण, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने एम जे एफ लायन सदानंद सखाराम गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दि 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, तहसील कार्यालयासमोर उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी इच्छुक रक्तदात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करून या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी विशाल पाटेकर -9920484545, प्राध्यापक डॉ. दत्ता हिंगमिरे -9922100391,विठ्ठल ममताबादे -9702751098 यांच्याशी संपर्क साधावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव पूर्व येथे जागतिक योग दिन उत्साहात संपन्न!

मुंबई : दर वर्षी २१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात "जागतिक योग दिन " म्हणून जगभरात साजरा केला जातो.       गोरेगाव पूर्व ये...