आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

उरण दिव्यांग एकजूट सामाजिक संस्थेच्या वतीने पालकमंत्री आदितीताई तटकरे यांना निवेदन

उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना स्थानिक प्रकल्पात नोकरीमध्ये आरक्षण देणे, दिव्यांगाना व्यवसायासाठी ठिकठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देणे, दिव्यांगाना व्यवसायासाठी स्थानिक कंपन्याकडून सी एस आर फंडातून अनुदान मिळावे, प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे, दिव्यांगच्या व्यक्तीच्या मुलांचे शिक्षण फी कायमस्वरूपी माफ करावे, दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य आरोग्य सेवा पुरविणे, रोजगारा करिता प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे आदी विविध मागण्यासाठी उरण दिव्यांग एकजूट सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष महेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या युवा महोत्सव, बोकडवीरा येथे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांची भेट घेऊन दिव्यांगाच्या सर्व समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी करत त्यांना निवेदन दिले. यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आदितीताई तटकरे यांनी दिले.यावेळी उमेश नारायण पाटील, नितीन कडू, संतोष म्हात्रे, दीपक म्हात्रे, संदेश राजगुरू, हिरावती घरत, राजश्री घरत, महेश भोईर, आईशा खान, उल्हास दर्णे, मिल्टन मिरांडा, आप्पासाहेब वाहवल, राजेंद्र पाटील आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मोहन जोशी यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' घोषित...

मुंबई (गणेश तळेकर)  मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना घोषि...