शनिवार, ८ जानेवारी, २०२२

'म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

 

मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये वाणिज्य  विभागाच्या वतीने  'म्युच्युअल फ़ंड मधील गुंतवणूक ' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.भरत गोंजारे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खोत सर उपस्थित होते.यावेळी प्रमुख वक्ते प्रा.भरत गोंजारे यांनी म्युच्युअल फंड याचे उदाहरणासहित विश्लेषण केले. विद्यार्थ्यांना म्युच्युअल फंडा मध्ये गुंतवणूक केल्याने भविष्यकालीन फायदा कसा होईल व आपले भविष्य कसे सुरक्षित होईल या बद्दल माहिती दिली.मुलांच्या मनावर आर्थिक साक्षरता बिंबवण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ तन्वी भागवत यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.प्राजक्ता शिंदे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जननायक दि.बा.पाटील, दास्तान फाट्याचा संग्राम या व्हिडिओ पोवाड्याचे शानदार उद्घाटन

मुंबई : दास्तान फाट्याचा संग्राम यशस्वी झाला म्हणूनच भूमिपुत्र आपल्याच भूमित राहिला. हे फक्त आणि फक्त दि.बा.पाटील यांच्यामुळेच घ...