मुंबई : प्रत्येकाला आपण ज्या शाळेत शिकलो,लहानाचे मोठे झालो,तिच्याबद्दल प्रेम,आपुलकी व अभिमान असतोच.आपल्याला ज्यांनी शिकविले,घडविले त्या शिक्षकांबद्दल आदर असतो.नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून जॉय ऑफ गिविंग मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने " माझी शाळा " या विषयावर कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून १८ वर्षवरील कोणीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकते.कविता स्वरचित, सुवाच्य व सुंदर हस्ताक्षरात १६ ओळी पर्यंत लिहिलेली असावी तसेच ती पूर्वप्रकाशीत नसावी. स्पर्धकांनी आपल्या कविता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत स्पीड पोस्ट व कुरीअरनेच पाठविलेली स्वीकारण्यात येईल.व्हाट्स-अप, ई मेल आणि टाईप केलेली कविता स्पर्धेसाठी ग्राह्य नसेल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. कविता मराठी भाषेत लिहिलेली असावी.पहिले तीन विजेते व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच पारितोषिके म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल . कविता पाठविण्यासाठी पत्ता: जॉय ऑफ गिविंग संस्था मुंबई ,C/O गणेश वसंत हिरवे ,२-१२ पार्वती निवास,रामनगर, बांद्रेकरवाडी,जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६०, मोबाईल -९९२०५८१८७८
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर
डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा