मुंबई(गणेश हिरवे)-आरेतील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीबरोबरच रस्ते मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री सन्माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांच्या समवेत आमदार श्री रवींद्र वायकर यांनी बैठका घेतल्या व पत्रव्यवहारही केले.
- पहिल्या टप्प्यात युनिट क्रमांक ५ (मार्केट) मयुर नगर बस स्टॉप पर्यंत, युनिट क्र.६ आरे हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता, पिकनिक पॉईंट ते युनिट क्र.२५ पर्यंतचा रस्ता, पोलिस स्टेशन ते छोटा काश्मिर या रस्त्यांचा यात समावेश
स्थानिक जनतेच्या मागणीनुसार आरेतील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास आजपासून सुरूवात करण्यात आली. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते आरेतील एकुण ४ अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या कामाचा सुभारंभ पार पडला. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी ९७ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुर करण्यात आले आहे. लवकरच मुंबई महानगरपालिकेतर्फे रुपये ४७ कोटी खर्चुन आरेतील सुमारे ७ किलोमीटरच्या मुख्य रस्त्याच्या कामाचेही भुमिपूजन पर्यावरण, पर्यटन व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहितीही, वायकर यांनी यावेळी दिली.
आरेतील ४५ किलो मीटरच्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेत वाढ होत असल्याने हे रस्ते मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावे अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करुन येथील जनतेला दिलासा देण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री माननीय आदित्य ठाकरे यांच्या समवेत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी बैठका घेऊन पत्रव्यवहारही केला होता. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात ३ कोटी २५ लाख रुपये मंजुर करुन हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता.
त्यानुसार आरेतील कार्यकारी अभियंता रामटेक यांनी आरेतील अंतर्गत १० रस्ते प्रस्तावित केले होते. आरे दुग्ध वसाहतीतील प्राप्त निधीचे विनियोजन व खर्च करण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या समितीची १० डिसेंबर २०२१ रोजी पार पडलेल्या बैठकीत १० पैकी पहिल्या टप्प्यात ४ रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यात युनिट क्र. ५ (मार्केट) मयुर नगर बस स्टॉप पर्यंतचा रस्ता (१५०० मीटर), युनिट क्र. ६ आरे हॉस्पिटल पर्यंत रस्ता (६०० मीटर), पिकनिक र्पॉर्फंट ते युनिट क्र. २५ पर्यंतचा रस्ता (२५० मीटर) व पोलीस स्टेशन ते छोटा काश्मिर (२५० मीटर) या रस्ते दुरुस्तीच्या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून यासाठी तब्बल १ कोटी ९७ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वायकर यांनी दिली. या रस्त्यांच्या कामांचा शूभारंभ आमदार व माजी राज्यमंत्री श्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. यावेळी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, नगसेविका रेखा रामवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कदम, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदिप गाढवे, अर्पणा परळकर, हर्षदा गावडे, मयुरी रेवाळे, सुरेखा गुटे, पुजा शिंदे, शाखा समन्वयक अँथोनी डिसोझा, युवासेनेचे वैभव कांबळी, रविंद्र भगत, वायकर साहेबांचे स्विय सहाय्यक आणि शाखा समन्वयक उमेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा