पनवेल :- सद्य:परिस्थितीमध्ये करोनाचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सर्व तहसील कार्यालयांमध्ये कोविड-19 कॉल सेंटर सुरू करण्याच्या कालच सर्व तहसिलदारांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पनवेल तहसिलदार कार्यालय येथे कोविड-19 कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 022-27452399 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नागरिक कोविड-19, बेड व्यवस्थापन, ॲम्बुलन्स तसेच अन्य वैद्यकीय सुविधा याबाबतची माहिती विचारू शकतात, वैद्यकीय मदत व मार्गदर्शन मिळवू शकतात, अशी माहिती पनवेल तहसिलदार श्री.विजय तळेकर यांनी दिली आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, सॅनिटायजरचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व तहसिलदार विजय तळेकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा