काहींनाच फक्त मान्य
कन्या जन्म वास्तवात,
वंश दिवा पाहिजेच
प्रत्येकाला कुटुंबात.!
आई, ताई, पत्नीसुद्धा
कन्या होत्या प्रारंभाला,
हातभार त्यांचा लागे
अनमोल संसाराला.!
मातेमुळे जन्म झाला
पुरुषच विसरला,
स्त्रीभ्रूणाचा हत्याकांड
समाजात पसरला.!
अज्ञानाच्या साम्राज्यात
हुंडाबळी, बलात्कार,
शिक्षणाच्या सावित्रीचा
ज्ञानज्योत चमत्कार.!
मितालीने क्रिकेटचा
इतिहास घडवला,
लतांनीही संगीतात
छान सूर गवसला.!
इंदिरांच्या नेतृत्वाने
अभ्युदय भारताचा,
कल्पनेच्या भरारीने
हिरा मिळे विज्ञानाचा.!
हेमा, मिथाली, सायना
यांनी खेळ दाखवला,
स्त्रिया सुद्धा मागे नाही
गैर दोष हटवला.!
भेदभाव विसरून
संपवूया विषमता,
मनी एक ध्येय ठेऊ
नर-नारी समानता.!
© भूषण सहदेव तांबे
मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा