आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

गुहागर तालुका नमन संघटनेचा लक्षवेधी उपक्रम : १० जानेवारीला मुंबईत नमन कार्यक्रमाचे आयोजन!

गुहागर-सोमवार दिनांक-१० जानेवारी २०२२, सोमवार रोजी ठीक रात्रौ ८:३० वाजता मास्टर दीनानाथ  मंगेशकर नाट्यगृह (मुबंई)- विलेपार्ले येथे " कोविड-१९ नियमांचे पालन करत , कुणबीवाडी विकास मंडळ -असोरे, (गुहागर)  यांचे लोकप्रिय बहुरंगी नमन कार्यक्रम "गुहागर तालुका नमन संघटनेच्या" वतीने आयोजित करण्यात आले आहे! नमन लोककला संस्था, संलग्न:"गुहागर तालुका नमन संघटना" या शाखेच्या निधी संकलन करीता तसेच संघटनेचा प्रसार, प्रचार आणि  "नमन लोककलेचं" संवर्धन तसेच  लोककलावंत यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि नमन मंडळ यांना नमन लोककला सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं या जाणीवेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक  गावा- गावात नमन मंडळांना आणि नमन लोककलावंताना जागृत करून शासन दरबारी न्याय मिळावा या शुद्ध हेतूने गुहागर तालुका शाखेच्या आर्थिक निधी उभारणी करीता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गुहागर तालुक्यातील संघटित झालेल्या नमन मंडळांनी तसेच कोकणातील बहुप्रिय  नमन लोककलेवर प्रेम करणारे तमाम रसिकप्रेक्षकांनी सदर कार्यक्रमाला उपस्तीत राहून तालुका शाखेने हाती घेतलेल्या उपक्रमाला सहकार्य करून

  सदर कार्यक्रमाच्या टिकट करीता संघटनेचे खजिनदार श्री उदय ग. दणदणे यांच्याकडे संपर्क साधावा असे आव्हान गुहागर तालुका नमन संघटनेचे अध्यक्ष:सन्मानीय - श्री सुधाकर मास्कर यांनी केले आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...