आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

नववर्षाची गझलमय सुरवात ; गुगल मीटवर नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून मुशायरा सदाबहार कार्यक्रम सादर

ठाणे : अखिल महाराष्ट्र साहित्य मंच या समूहाचे सन्मा. अध्यक्ष योगेश चाळके सर  व पंचकमिटी आयोजित इल्म - ए - गझल ग्रुपचा गझल मुशायरा  सावित्रीबाई फुले  यांना विनम्र अभिवादन करून   2 जानेवारी 2022 रोजी रात्रौ ठिक ९:30 ते १२ वाजेपर्यंत   गूगल मिटवर संपन्न झाला .या कार्यक्रमाचा  उद्घाटन सोहळा मा.डाॅ. विजया  यांच्या हस्ते पार पडला. 

   यावेळी एक प्रकर्षाने जाणवले की सर्वांच्याच गझलमध्ये वैविध्यता तर होतीच तसेच कांही शेर ऐकताच " वाह ! " अशी दाद मनाने किती नकळत दिली . आ . योगेश सरांचे मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषण पण नेहमीप्रमाणेच  अभ्यासपूर्ण तर होतेच शिवाय हसत खेळत कोपरखळ्या देत केले जाणारे गझल संस्कार मनाला फार भावले .   आयोजन , निवेदन , सूत्रसंचलन या बाबत तर सरांसह - आरती लाटणे  , स्वाती काळे  , प्रिया मयेकर  तसेच अतूल  दिवाकर  सर यांनी सुंदर संगम  साधला .    

    तसेच गझल मुशय-यातील  सहभागी  सर्व सदस्य सन्मा.  श्री अतुल दिवाकर, आरती लाटणे , प्रिया मयेकर, स्वाती काळे भारती नाईक अरुण सावंत,  अशोक कांबळे, राजेश नागुलवार,  शिल्पा सकपाळे, सीमा झुंजारराव सिंधु बोदले डाॅ. विजया नवले, मनोज दीक्षित हेमंत रत्नपारखी ,गौरी शिरसाठ   सदस्यांचे विशेष  कौतूक . दर्जेदार शेर ऐकवीत त्यांनी फार सहज सुंदर गुंफण केली होती.  त्यामुळे  ऐकता ऐकता "वाजले की बारा " याचेही भान राहीले नाही . इल्म - ए - गझल ग्रुपच्या नववर्षाच्या उपक्रमांची सुंदर सुरुवात केल्याबदल आ . योगेश सरांचे आणि सर्व गझल स्नेहींचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रम सन्माननीय योगेश सरांच्या गझल ने समाप्ती झाली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आंगवली -रेवाळे वाडी भावकिचा भैरी भवानीचा गोंधळ थाटामाटात संपन्न

कोकण (शांताराम गुडेकर )रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसर...