पनवेल : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती सोहळा अर्थात पत्रकारदिन शासकीय विश्रामगृह उरण येथे उत्साहात पार पडला.
पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे , सचिव, वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, लालचंद यादव यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी समितीच्या कार्याची माहिती उपस्थित सर्वांना देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील, रायगड अध्यक्षा रेखा घरत, उरण अध्यक्षा निर्मला पाटील, सीमा घरत , आवाज कोकणचा कार्यकारी संपादक आरती पाटील या पंचज्योतीच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाली .
उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, कार्याध्यक्ष संजय गायकवाड, वरिष्ठ पत्रकार अजित पाटील, विरेश मोखडकर, पूजा चव्हाण, अशोक घरत, आदित्य वाघ, आशिष पाटील, अनंत नारांगिकर, उपस्थित होते.
वरिष्ठ पत्रकार टीव्ही वन इंडिया चॅनल चे सुधीर शर्मा यांनी मार्गदर्शन केले तर संजय गायकवाड यांनी उरण तालुका मराठी पत्रकार संघ व पत्रकार उत्कर्ष समिती यांनी एकत्र येत पत्रकार बंधुभगिनी व समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले .याच कार्यक्रमात आवाज कोकणचा साप्ताहिकाचा वर्धापनदिन व द्वितीय वर्षातील अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम जाधव, गणेश कांबळे , सातारा येथे दत्ता इनादार, उस्मानाबाद येथे अझीम काझी , अकोला येथे सतीश देशमुख, वाशिम येथे रमेश देशमुख, यवतमाळ येथे मनीष खर्च, सांगली येथे रोहित पाटील , मुंबई येथे पंकज पाटील या सर्वांनी आपापल्या सहकाऱ्यांसह मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा