मुंबई : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात
भारतीय संविधानाचे महत्त्व नरेंद्र पांगे आणि अनिल घाडीगांवकर यांनी मुलांना समजावून सांगितले. लहान मुलांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदन झाल्यानंतर लहान मुलांनी गाणी तसेच डान्स सादर केले. उत्कृष्ट गाणी तसेच डान्स सादर केलेल्या मुलांना भेटवस्तू देण्यात आली. सदर कार्यक्रमास
भाई मयेकर, लक्ष्मण देवरुखकर, विनोद मकवाना, सुनील डीचोलकर, राकेश जेजुरकर, निकेश जाधव, संतोष सकपाळ, प्राची कदम, संतोष कदम, प्रसाद सावंत, सत्यवान नर आदी कार्यकर्ते तसेच लहान मुले मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धिप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सांडपाणी पाइपलाइनविरोधात गडब -खारजांभेळा ग्रामस्थ आक्रमक
जेसीबीने पाइपलाइन उखडली, पाइपलाइन वाद चिघळला ; सरपंच मानसी पाटील यांना मारहाण, वडखळ पोलिसांत तक्रार गडब (अवंतिका म्हात्रे):पेण ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा