सरपंच मानसी पाटील यांना मारहाण, वडखळ पोलिसांत तक्रार
गडब (अवंतिका म्हात्रे):पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव गडब हद्दीतील आर डी कॉम्प्लेक्स येथून जाणाऱ्या सांडपाण्याच्या पाईपलाईन विरोधाल खारजांभेळा ग्रामस्थ आक्रमक झाले प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर जेसीबीच्या सहाय्याने अखेर ही पाईपलाईन उखरून काढली
आरडी कॉम्पेलेक्सचे मोजे काराव ब्राह्मणाचा ओढा या मार्गावर ही सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती .हा ओढा खाडी मार्गातून असून याच परिसरात जागरण जोगमाता देवीचे पुरातन मंदिर आहे .मंदिरासमोर सांडपाणी सोडण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून मंदिराचे पवित्र धोक्यात आले आहे. तसेच ओढ्यातील प्रदूषित पाण्यामुळे स्थानिक मासेमारी व्यवसायावरसुद्धा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .याबाबत ग्रामस्थांनी प्रांताधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. तरी बडीमो यांनी पुन्हा मिटींग घेऊ असे सांगण्यात आले होते. यावर पंचायत समिती येथे मिटिंग घेण्यासाठी खारजांभेळा ग्रामस्थ तयार होते. परंतु मिटींग झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाईपलाईन काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोन गटांमध्य जोरदार वाद निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला . मात्र संतप्त ग्रामस्थ आणि जेसीबीच्या माध्यमातून सदर पाईपलाईन उकडून काढली वाद वाढत असल्याने परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पाईपलाईन काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान एका महिलेने आपल्या कांशीलात मारण्याचा आरोप सरपंच मानसी मंगेश पाटील यांनी केला असून संबंधित महिलेविरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी घटना स्थळी सरपंच मानसी मंगेश पाटील, उपसरपंच परशुराम मोकल तसेच सदस्य दिनेश म्हात्रे,भाग्याश्री कडू, सीता पाटील,मुक्ता वाघमारे,मनोहर पाटील तसेच गडब पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा