आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २९ जून, २०२६

मन्नत मल्टीपर्पज कार्यालयाचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन ; महिला सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - अनिकेत तटकरे

गडब (अवंतिका म्हात्रे): मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन कार्यालयाचे शुक्रवार दिनांक 26 जून रोजी संध्याकाळी 4 वाजता विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनिकेत तटकरे यांनी मन्नत मल्टीपर्पज असोसिएशनच्या अध्यक्षा मुस्कान झटाम व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महिला सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
       मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन ही एक संस्था असून ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच शासकीय व अर्ध शासकीय कार्यालयांना आवश्यक विकासात्मक सेवा,साहित्य व उपाय योजना एकाच छताखाली, मागणीनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देते. तसेच मोठ्या प्रमाणावर आरोग्य प्रशिक्षण व जनजागृती मोहिमा राबवण्याची क्षमता या संस्थेकडे आहे.
      मुस्कान रफिक झटाम या महिला सक्षमीकरणासाठी गेल्या दशकापासून कार्यरत आहेत. स्वतः ट्रेनिंग देण्यापासून केलेली सुरुवातीचे रूपांतर आज संस्थेमध्ये झालेले आहे. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीची संधी निर्माण करणे, कायदेविषयक जागृती, महिला बालकल्याण निगडीत सर्व बाबी, उच्च शिक्षित तज्ञ प्रशिक्षक यांच्या मार्फत मार्गदर्शन व गुणवत्ता यासाठी संस्था कटिबद्ध असणार आहे. या माध्यमातून हुन्नरी प्रशिक्षकांना देखील रोजगार मिळणार आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम देखील यापूर्वी राबवले गेलेले आहेत आणि यापुढेही राबवण्यात येतील. स्किल डेव्हलपमेंट बनवण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही अध्यक्षा मुस्कान झटाम यांनी सांगितले.
  या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, जि.प. सभापती वैकुंठ पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, नगसेविका तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पेण विधानसभा अध्यक्ष वसुधा पाटील डॉ.रत्नदीप गवळी, जिल्हा परिषद सदस्यअमित नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष उमाताई मुंढे, पशु संवर्धन सभापती वैकुंठशेठ पाटील माजी नगराध्यक्ष आणि नगरविकास अध्यक्ष संतोष श्रृंगातपुरे माहिला बालकल्याण सभापती कलावती पाटील ,गायकर साहेब तालुका अध्यक्ष दयानंद भगत,, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकुर विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे पेण शहर अध्यक्ष सुचिता चव्हाण पेण तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील तन्वी हजारे निळकंठ म्हात्रे,मंगेश नेने,हबीब खोत, भरत शहा मितेश शहा वैशाली गुरव धनश्री दोषी प्रितेष दोषी सुचिता म्हात्रे तबसुम पठाण चैतन्य आदींसह पत्रकार बंधू उपस्थित राहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सांडपाणी पाइपलाइनविरोधात गडब -खारजांभेळा ग्रामस्थ आक्रमक

जेसीबीने पाइपलाइन उखडली, पाइपलाइन वाद चिघळला ;  सरपंच मानसी पाटील यांना मारहाण, वडखळ पोलिसांत तक्रार गडब (अवंतिका म्हात्रे):पेण ...