ठाणे/प्रतिनिधी : जि.प. शाळा- वेहेळे येथे थोर गणिततज्ज्ञ,गणित संशोधक-जनक श्रीनिवास रामानुजन यांचा जयंती दिन शासन निर्देशाप्रमाणे दि.२० डिसेंबर ते दि.२२ डिसेंबर रोजी वैविध्यपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थी बालगोपाळांसह साजरा करण्यात आला.दि.२० डिसेंबर रोजी भौमितिक आकार आकृतीबंध,गणितीय गमंती जमंती,गणितीय संख्याज्ञानावर आधारित रांगोळी,पोस्टर्स रंगविणे,चिञकला,फलकलेखन इ.आयोजन केले होते.यात विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिला.
दि.२१ डिसेंबर रोजी स्कॉलरशिप व नवोदय परिक्षेतील बुध्दीमत्ता चाचणीवर आधारित कुटप्रश्न,बौद्धिक कोडी,व्यावहारातील गणिते सोडवून घेतली.दि.२२ डिसेंबर रोजी थोर गणित तज्ज्ञ संशोधक श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पहार अर्पण करुन गणिताचार्य श्रीनिवास यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी सविस्तर माहीती वरिष्ठ शिक्षिका सौ. चंचला पाटील मॅडम यांनी विशद केली.
शाळेच्या नवोपक्रमशिल शिक्षिका सौ. जयश्री ढाके मॅडम यांनी रामानुजन यांचा जन्मोत्सव हा गणितोत्सव म्हणून साजरा करित असतांना निपुण भारत अंतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व पायाभूत संख्याज्ञानावर आधारित राबविलेल्या उपक्रमात आपण गणितोत्सवात संख्या क्रमवार लावणे,आकृतिबंध तसेच गणिती पाया मजबूत करण्यासाठी गणित विषयाची आवड व गणितीय सराव तसेच गणितीय बडबडगीते इ.बाबत हसतखेळत गणित शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहीती दिली.
शाळेचे प्राथमिक शिक्षक श्री.राजेंद्र सातपुते सर यांनी गणित विषयाची गोडी लागण्यासाठी गणितोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद दिला.तसेच विद्यार्थ्यांचे ६ गट तयार करुन राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य लक्षात घेऊन गणिताचार्य श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर व गणिती संशोधनांवर आधारित कुटप्रश्न व प्रश्नमंजुषा घेतली.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम ममता निकवाडे यांनी दि.२० डिसेंबर ते २२डिसेंबर पर्यंत गणितोत्सव विद्यार्थी समवेत साजरा करुन विद्यार्थ्यांना गणिती विषयाच्या गमंती जमंती,मनोरंजनातून गणिती शिक्षण,कृतियुक्त शिक्षण वक्तृत्व रांगोळी,पोस्टर्स,चिञकला तसेच पायाभूत संख्याज्ञानावर आधारित वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून स्वानंद दिल्याबद्दल सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. या उपक्रमात शाळेतील श्रीम नमिता पाटील, श्रीम माधुरी पाटील, श्रीम छाया जाधव, श्रीम संजना पाटील, श्री निलकमल मेश्राम या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला दिनांक 22 डिसेंबर रोजी सन्माननीय केंद्रप्रमुख श्री संख्ये सर यांनी या उपक्रमाला भेट देऊन विध्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.गणितोत्सवाचा समारोप गणितीय खेळ गीतगायन व खाऊ वाटपाने झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा