आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

पथनाट्य आणि चित्ररथाद्वारे जिल्ह्यात होणार राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

अलिबाग-  राष्ट्रीय ग्राहक दिन  साजरा करण्याच्या निमित्ताने दि. 24 डिसेंबर 2021 रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून ग्राहक जागृतीसाठी चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून हा रथ जिल्ह्यात सर्वत्र फिरविणे तसेच अलिबाग शहरात (1)जिल्हाधिकारी कार्यालय (2) अलिबाग बीच (3) अलिबाग बाजारपेठ ( बस स्टँड जवळ) अशा तीन ठिकाणी पथनाट्याचे आयोजन,असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी कळविले आहे.

    या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष श्री.रवींद्र नगरे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे असणार आहेत. 

     अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांची विशेष उपस्थिती लाभणार असून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव मस्के-पाटील,  जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जय मेहत्रे, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार विशाल दौंडकर, सतीश कदम, सचिन शेजाळ, मीनल दळवी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, वैधमापन शास्त्र उपनियंत्रक श्री. राम राठोड, विभाग नियंत्रक राज्य परिवहन मंडळ श्रीमती अनघा बारटक्के यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...