अलिबाग -नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा, असे आवाहन प्रसिध्द क्रिकेटपटू रोहित शर्मा याने केले आहे. रोहित शर्मा हा खाजगी कामानिमित्त अलिबाग येथे आला होता. त्यावेळी त्याने रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी व सारळ मंडळ अधिकारी श्री. पी.बी मोकल व इतर अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.करोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग त्रासलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये करोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. त्यादृष्टीने सध्या सर्वत्र प्रशासनातर्फे लसीकरणावर जोर दिला जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रशासनाकडून सर्व पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. यात प्रामुख्याने विविध सुप्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री यांच्या व्हिडीओ चित्रफित माध्यमाचा वापर करून नागरिकांना लसीकरणाबाबतचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत असून लस घेण्याबाबत आवाहनही केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रिकेटपटू रोहित शर्मा याने अलिबाग येथे भेट दिली असता त्याने रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी करोना लसीकरण करून घेण्याबाबतचे आवाहन करणारी रोहित शर्मा याची ही व्हिडीओ चित्रफित मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा