मुंबई (शांताराम गुडेकर)- गुरुग्राम, येथील Kingdom of Dreams येथे शनिवारी (दि.१८ डिसेंबर २०२१)पार पडलेल्या "मिस डायडेम इंडिया २०२१ " च्या "मिस इंडिया " या स्पर्धेत पोखरण, जिल्हा- सिंधुदुर्गची कोकण कन्या तसेच बोरिवली, गोराई येथील कोकणचा मान उंचवणारी कु.सायली नारायण सांवत हिने द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक हे विजेतेपद पटकावले.सायलीचे मूळ शालेय शिक्षण हे गोराई, बोरिवली येथील सेंट रॉक्स हायस्कूल मधून झाले आहे.विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाची ती माजी विद्यार्थिनी असून,सानपाडा- नवी मुंबई येथील ATDC या फॅशन डीजाईनिंग संस्थेमधून तिने पदवी प्राप्त केली आहे आणि यांच्या माध्यमातून तिला पुढे या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले गेले. ATDC मधील शिक्षक आणि तिचे कुटुंब यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी इथे पोहचू शकले असे सांगून सायलीने त्यांचे आभार व्यक्त केले. याबाबत सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.एका मध्यम वर्गीय कुटुंबातील सायलीने हा उच्च पातळीवरील सन्मान मिळवल्याने तिचे अनेकांकडून शुभेच्छा देत अभिनंदन केले जात आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील
दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा