आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ जून, २०२०

पेणमध्ये मनसे प्रमुख आणि हिंदुजननायक राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ; विविध उपक्रमांचे आयोजन





पेण /प्रतिनिधी :

दि.१४ जून  रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून   संदीपदादा ठाकूर( मा.रायगड जिल्हा संघटक रोजगार स्वयं.रो मनसे ) यांच्या आयोजनातून  कोरोना रोगाच्या  पार्श्वभुमीवर सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून,  तोंडाला मास्क लावून तसेच  हॅंड सॅनिटायझरचा वापर करीत पेण विधानसभेत ठिकठिकाणी मनसेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 
   त्यानुसार पहिल्या कार्यक्रमात पेण तालुक्यातील अहिल्याबाई होळकर महिलामंडळ स्नेहांगण संचालित  वृद्धअनाथ आश्रम मु-तरणखोप,ता -पेण येथील वृद्धांसोबत राजसाहेबांच्या    वाढदिवसाचा केक कापून सर्व वृद्ध आज्जी व आजोबांसोबत आनंदमयी वातावरणात अत्यावश्यक वस्तु वाटप आणि वृक्ष रोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.दुसऱ्या कार्यक्रमात पेण तालुक्यातील पुर्व विभागातील चाईल्ड हेवन इंटरनेशनल स्कुल निवासी आदिवासी व अनाथ वसतिगृह मु -सावरसई ता -पेण येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  
    पेण तालुक्यातील ग्रुपग्राम पंचायत डोलवी येथे वृक्ष रोपणाचा तिसरा  कार्यक्रम घेऊन शेकडो वृक्षांची लागवड  करण्यात आली. तर सुधागड तालुक्यातील नाडसुर वाडी येथील गावांतील गरजु विद्यार्थ्यांना मोफत शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा  भरगच्च कार्यक्रम उत्साहात साजरा करून उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
   यावेळी संदिपदादा ठाकुर यांच्यासोबत पेण विधानसभेतील  तालुक्यातील प्रविण म्हात्रे,प्रफुल पाटील,समीर पाटील,अजित म्हात्रे,अमित पाटील,सचिन पाटील,हेमंत पाटील,प्रथमेश पाटील,चेतन पाटील,सुनील पाटील तसेच पाली-सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे ,केवल चव्हाण आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक उत्साहाने उपस्थित होते.मनसेच्या वतीने राजसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमातील आज्जी आजोबांचे आशिर्वाद व आदिवासी तसेच अनाथ आश्रमातील बालमित्रांचे प्रेम व शुभेच्छा मिळाल्या.त्याकरिता मनसेच्या वतीने संदिपदादा ठाकुर यांनी साहेबांच्या वतीने विशेष आभार मानले व यापुढेही मनसे आपल्या सेवेस कार्यतत्पर असेल याची ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमाला पेण/पाली-सुधागड मतदार संघातील सर्व पदाधिकारी  आणि कार्यकर्ते,  महाराष्ट्र सैनिक यांची  उपस्थिती लाभली  होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

विक्रोळीत पार पडले आदरांजली पर कवी संमेलन ; कवी प्रतिक कांबळे यांच्या बापावर थोडं लिहावं म्हणतो या कवितेने अश्रू अनावर

विक्रोळी( प्रतिनिधी): शाहीर कुंदन कांबळे यांचे चिरंजीव चंदन कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विक्रोळीत रत्नबोधी बुद्ध विहार येथे ८ सप्...