आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ जून, २०२०

हिंदूजननायक राज ठाकरे यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे साजरा!




पेण- (दिपक लोके )                   

     विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा या निर्धाराने  हिंदू जननायक राज ठाकरे यांचा  वाढदिवस दि. 14 जून रोजी  पेण तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
    रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभेत  राज ठाकरे यांचा वाढदिवस  रुपेश पाटील यांच्या आयोजनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस साजरा करताना वृक्ष लागवड, रुग्णालयांत फळ वाटप, फुटपाथवरील गोरगरीब लहान मुलांना खाऊ वाटप असे अनेक उपक्रम हाती घेतले होते.रायगड जिल्ह्यात चक्री वादळामुळे  मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली होती. त्यामुळे शक्य तेवढ्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे होते. म्हणून मा. राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली.पेण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयांत फळ वाटप करण्यात आले. फुटपाथवर राहणाऱ्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
    यावेळी मनोहर नाईक तालुका सचिव,हनुमान नाईक विभाग अध्यक्ष, रोहित पाटील, राकेश पाटील,रोशन पाटील,रणजीत पाटील, निकेश पाटील, अजय खाडे आदीसह मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...