मुंबई -(गणेश हिरवे )
संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे 750 वे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य व कोरोनाच्या पाश्वभूमीमुळे अँड. सुधीर पिसे अध्यक्ष,नामदेव समाजोन्नती परिषद यांचे मार्गदर्शनाखाली यावर्षी पंढरीची वारी निघणार नसल्यामुळे नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर, समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ, कसबा पेठ व शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करून कसबा पेठ पुणे येथील नामदेव मंदीरात बंदिस्तपणे किर्तनाचे चित्रीकरण करून ते आधुनिक तंत्रज्ञानाचे माध्यमातून आँनलाईन पध्दतीने प्रसारीत करून आपल्या सगळ्यांना वारीचा आनंद घरी राहून घेता यावा,पांडुरंगाच्या नामाचं श्रवण करता यावे यासाठी पुणे दर्पण न्यूज या चॅनेलचे सहकार्याने आॅनलाइन कीर्तनमालेचे आयोजन दिनांक 15 ते 22 जून या कालावधीत दररोज सायंकाळी 6.00 ते 7.30 या वेळेमध्ये करण्यात येणार असून या उपक्रमातून वारी प्रत्यक्ष अनुभवू न शकणा-या हरिभक्तांना भक्तीरसात न्हावू घालण्याचा परिषदेचा मानस आहे.तरी या कीर्तनमालेच्या प्रक्षेपणाचा आनंद हरिभक्तांनी व इतर नागरिकांनीही घेण्याचं आवाहन पुणे जिल्हा नासप अध्यक्ष संदीप लचके व कार्यलयीन सचिव सुभाष मुळे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा