सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या घरात मित्र सोबत असताना त्याच्याकडे स्वताच मन मोकळे करून बोलू शकला नाही . मनावरील ताणाचा सामना करत हरला आणि त्याने आत्महत्या केली . जे त्याला त्या क्षणाला योग्य वाटले ते त्याने केले त्यात त्याची काहीच चुक नाही . ह्यातून एक गोष्ट निष्पन्न होते , जगात कोण कुणाचा नसतो , विश्वासाने कोणाच्या खांद्यावर डोके ठेवावे तो खांदाच अस्तित्वात नाही याची जाणीव जेव्हा होते तेव्हा माणूस एकला चलो रे म्हणून काही काळ सहन करतो पण सहन शक्ती संपली की विचारांती शेवटचे टोक गाठतो .वैचारीक मती कुंठीत झाली की , मनावर भावनांचा पगडा आरूढ होतो .त्यात स्वताला गुंतवून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग स्वताच बंद करतो . वैचारीक गुंत्याचा अंमल मनात दाबून बहूतांश लोक हे जिवंत असून केव्हाच मृत झालेले असतात पण जग काय म्हणेल , नामुष्की होईल , मागे कुटुंबियांना टक्के टोमणे ऐकावे लागतील ह्या दडपणाखाली फक्त शरीर जिवंत ठेवतात. प्रत्येकाला वाटते मी माझ्या विचारांशी प्रामाणिक आहे आणि तो असतो ही पण हेच प्रमाण तो दुसर्याच्या बाबतीत राबऊ शकतो का तर त्याचे उत्तर नाही असेच असते. म्हणूनच म्हणतात ना आपले मन आपल्या जवळच्या माणसाकडे व्यक्त करावे पण तसा कोणी नसतो आणि नाही म्हणून अनिच्छेने का होईना माणूस आत्महत्या करतो . त्याचा दोष कोणालाच देता येणार नाही. जे घडतं आणि घडत राहणार हा नियतीचा खेळ आहे आणि तो सुरुच रहाणार यांत दुमत नाही . शेवटी काय तर सारी ईश्वराची करणी , जे नशिबात असेल तेच होते असे सारेजण म्हणतात . पण कोणत्याही क्षेत्रातील कोणीही माणूस निधन झाल्यानंतर या जगातून निघून गेला की अशा वेळी मला मात्र ' जन पळभर म्हणतील हाय हाय , तू जाता राहील कार्य कार्य ' या कविवर्य भा.रा .ताबें यांच्या अविस्मरणीय काव्याची आठवण होते . अभिनेता सुशांत सिंह राजपूत या जगातून निघून गेला , आता त्याची यशस्वी कारकिर्द मागे उरली आहे , आणि त्याच्या आठवणी फक्त उरल्या आहेत .
माझ्या विचारांना जे पटले ते मांडले , सहमत होणे न होणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
-लक्ष्मण राजे
मीरा रोड पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा