पेण / प्रतिनिधी :
कोरोना या विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पेण-रायगड यांच्या मार्फत शर्मिला राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांच्या विद्यमाने (आर्सेनिक अल्बम-३०) या १ लाख गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोना या संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करण्यासाठी शासकीय नियम पाळणे, सोशल डिस्टन पाळणे, व रोग प्रतिकार शक्ती वाढवणे एवढेच केले तरी कोरोना चा मुकाबला आपण करू शकतो असे पेण विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी सांगितले. संपूर्ण पेण तालुक्यात एक लाख अर्सनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.हा स्तुत्य कार्यक्रम केल्याबद्दल महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण तालुक्यात कौतुक होत आहे. यावेळी पेण तालुका अध्यक्ष अंकुश म्हात्रे, प्रल्हाद पारंगे, मनोहर पाटील, संदीप म्हात्रे, हनुमान नाईक, रोहित पाटील, महेश नागे, राकेश पाटील, निलेश पाटील, रणजीत पाटील, निकेश पाटील, रोशन पाटील, रवी, रुपेश पाटील आदींसह सर्व मनसे कार्यकर्ते यांनी गावोगावी जावून पेण तालुक्यात आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्यांचे मोफत वाटप केले आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सैनिक देखील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा