पेण -(दिपक लोके)
पेण तालुक्यातील वरेडी गावातील श्री रमण पाटील सर नामक हा शिक्षक सुधागड एज्युकेशनच्या रावे शाळेवर जून १९९७ मध्ये माध्यमिक विभागात हजर झाला. घरातील पहिलाच मुलगा बीए -बीएड झाल्यामुळे घरात आनंद होता आणि त्वरित शाळेवर रुजू झालेल्या मुले पेशाने टेलर असणाऱ्या वडिलांना खूप आनंद झाला परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते
रमण पाटील सर शाळेवर लागल्यावर वडिलांनी पाटील सरांचे दोनाचे चार हात करण्याचे ठरवले आणि भालगाव च्या पेशाने नर्स असणाऱ्या माधवी नामक मुलीशी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्न लावून संसार थाटून दिला त्यानंतर या दोघांनी आपला संसार करण्यास सुरुवात केली आपल्या नवऱ्याला आज उद्या परवा एक महिन्यात एक वर्षात पगार मिळेल या आशेवर माधवी आपल्या संसाराचा गाडा आजपर्यंत हाकत आली हे सर्व करत असताना संस्थाचालकांच्या घराचे उंबरठे झिजवून सुद्धा संस्थाचालकांना काही पाझर फुटले नाही
याच शाळेचे मुख्याध्यापक श्री के. पी. पाटील यांनी रमण पाटील सर सिनियर असून सुद्धा संस्थाचालकांना सांगून आपली पत्नी नलिनी भोईर यांची नेमणूक करून घेतली सर्व प्रवासात पुलाखालून खूप पाणी वाहून गेला माधवी पाटील व रमन पाटील सर यांनी खूप संघर्ष केला परंतु २३ वर्षाच्या प्रदीर्घ लढाईत यांना काही यश आलं नाही शेवटी ३१ मे २०२० रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी रमण पाटील सर हे रावे हायस्कूल वरच२३ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
या सर्व गोष्टीवरून एकच म्हणता येईल की एक कम नशिबी शिक्षक विनावेतन निवृत्त झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा