यावेळी "सारेगमप विजेता अभिजीत कोसंबी यांचा “स्वर झंकार” हा मराठी- हिंदी संगीत संध्या" कार्यक्रम होणार असून हा सोहळ्यात
प्रतिवर्षाप्रमाणे मुलुंडमधील विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्वांचा ( ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, मास्टर ऑफ फाईन आर्ट, आर्टिस्ट सौ.अश्विनी पाटील, ज्येष्ठ नागरिक,ठाणे मॅरेथॉन विजेत्या श्रीमती.रेखा ताम्हणेकर सर्व मुलुंडकर )यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या वर्धापन कार्यक्रमासाठी भारतीय जीवन बिमा निगम (एल.आय.सी.), न्यु इंडिया एश्युरन्स कं.लि.,दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि., स्टेट बॅंक ऑफ ईंडिया,एन के जी एस बी, टी जे एस बी
लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑ.सोसायटी लि. यांचे सौजन्य लाभले आहे.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून आपल्या मित्रपरिवारासह अवश्य उपस्थित रहावे असे संस्थेकडून कळविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा