आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १३ मे, २०२०

पेण उपजिल्हा रुग्णालय कोवीड १९ चे रुग्णालय ? पेणकरांमध्ये संभ्रम तालुक्यात दहशतीचे वातावरण


पेण दि.१३ (अरविंद गुरव) कोरोना या विषानुने आपला फास महाराष्ट्रावर अधिकच घट्ट केला आहे. आता कोरोना ग्रामीण भागातही शिरकाव करण्यास सुरवात केली आहे. पेण पासून अवघ्या ३० कीमी अंतरावर असलेल्या पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २५० पार गेली आहे. तेथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी दवाखान्यात खाटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अन्य शहरातील रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण ठेवण्याची नामुश्की आली आहे. 
       त्यात सोशल मिडियावर फिरत असलेल्या संदेशानुसार पेण उपजिल्हा रुग्णालय येथे पनवेल आणि अन्य ठिकाणच्या कोविड १९ (कोरोना) बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पेणकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. शहरात दहशतीचे वातावरण झाले आहे. पेण तालुक्यात एकही रुग्ण नसतांना हां उठाठेव का ? पेण येथील उपजिल्हा रुग्णालय हे शहरातील दाट वस्तीच्या भागात असल्याने त्या भागात संसर्ग होण्याची भीती अधिक आहे याकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यातच जेएसडब्लू या कंपनीने नुकतेच पेण उपजिल्हा रुग्नालयाला ४५ लाख खर्चून ५० खाटा आणि सर्व सोई उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या या संशयाला अधिकच बळ मिळत आहे.
       पेण तालुका हा ऑरेंज झोन असताना पेण उपजिल्हा रुग्णालय येथे कोवीड १९ (कोरोना) बाधितांवर उपचार करण्यात येत असेल तर पेण तालुका हा ऑरेंज झोन जाऊन रेड झोनकडे जाण्याची दाट शक्यता असल्याचे नागरिकांतुन बोलले जात आहे. परंतु येथील भाजपचे स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्हाधिकारी निधि चौधरी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार पेण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे तालुक्या बाहेरील कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी आनन्यासाठीचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. त्यामुळे पेणमधील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन आ. पाटील यांनी केले. त्यामुळे पेण तालुक्यातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.





1 टिप्पणी:

swapn mhatre म्हणाले...

50 bed sathi 45 lac.🙄🙄

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...