१९६२ साली चीन देशाने भारतावर आक्रमण केले . त्या काळात भारतीय लष्कराने शेजारच्या चीनी शत्रू राष्ट्राशी युद्ध केले . त्यावेळी आता सारखी सर्वाधिक आधुनिक सुसज्ज शस्त्रे भारतीय लष्कराकडे नसताना देखील भारतीय लष्कराने मोठ्या धैर्याने चीनी शत्रुशी सामना केला . अशा वेळी शेजारी शत्रू राष्ट्र चीनने केलेल्या आक्रमणा मुळे आणिबाणीच्या परिस्थितीत भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत तातडीने बोलावून घेतले आणि तात्काळ त्यांची भारताच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती केली होती . "हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला " हा इतिहास आहे . मराठी माणसालाच काय संपूर्ण देशातील भारतीयांना अभिमानास्पद वाटणाऱ्या या ऐतिहासिक घटनेला आता ५८ वर्षे झाली आहेत . तरीही पुन्हा चीनने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे अप्रत्यक्षपणे आक्रमण केले आहे का ? याचा विचार केला पाहिजे .
आता पुन्हा जगात महासत्तेच्या लालसे पायी चीन अमेरिकेशी सत्तासंघर्ष करतोय . COVID - 19 चा फुल फाॅर्म काय आहे असे जर कोणी विचारले तर एकच उत्तर म्हणजे " China Organized Virus In December 2019 " असं असेल . चीन मधील वुहान मध्ये असणाऱ्या प्रयोगशाळेतूनच बाहेर आलेले कोरोना व्हायरसचे अदृश्य विषाणु वातावरणात मिसळले आहेत असा अमेरिकेने चीनवर आरोप केला आहे . याचे वाईट परिणाम भारता सहीत जगातील सर्व देशांना भविष्यात भोगावे लागले आहेत . देशातील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे . भारताने सावध पवित्रा घेतला असून अलीकडेच देशातील व्यापारी आपला नफा-तोटा सोडून देश व सैन्यासमवेत उभे राहिले आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणजे *नोएडाच्या व्यापार्यांनी* मॉलसाठी चीनची 150 दशलक्षांची मागणी रद्द केली आहे . तसेच एनसीआर कडून केवळ १५०० कोटी आणि चीनचा रोष दिसल्यास संपूर्ण देशातून सुमारे २अब्ज डॉलर्सची मागणी रद्द करण्यात आली आहे . सध्या ते २अब्ज आहे, ज्या दिवशी ६२ अब्ज डॉलर्स बंद असतील तेव्हा काय होईल ?
आता जर आपण चिनी वस्तूंची खरेदीच थांबवली तर व्यापारी विक्री करणार नाहीत , म्हणुनच आता पासून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणारे व्यापारी खरोखरच आदरणीयआहेत.
जेव्हा लोक देशाच्या हितासाठी एकजूट होतात, तेव्हा एक अर्थपूर्ण निष्कर्ष निघतो, ज्यामुळे जगात देशाची शक्ती प्राप्त होते आणि परिणामी सार्वभौम भारत तयार होतो. सर्व देशप्रेमींनी चिनी वस्तू वर बहिष्कार घातला पाहिजे . नाही तर समजा जर चीनने भविष्यात भारताचा ताबा घेतला तर त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिक जबाबदार राहील . चीनची ही कृती भारत निश्चितच हाणून पाडण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करेल . ब्रिटिशांनीही भारतात व्यवसाय करून भारताच्या नागरिकांना गुलाम केले होते . तेव्हा भारतीय नागरिक अशिक्षित होते पण आज शिक्षित आणि अतिशय समजूतदार आहेत .
देश वाचवाविण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांनी सध्या कोणतीही चिनी वस्तू खरेदी न केल्यास जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला सुजलाम सुफलाम असा भारत देश निश्चितच एक अतिशय श्रीमंत देश होऊ शकतो . केवळ ९० दिवसात भारताचे २ रुपये १ डॉलरच्या बरोबरीचे असतील आणि हे मात्र निश्चितच होईल यात मुळीच शंका नाही . गेल्या वर्षी २०१९ मध्ये दिवाळीच्या दिवशी, पहिल्या मोहिमे अंतर्गत भारतीय जनतेने चिनी दिवे खरेदी केले नाहीत, त्यानंतर चीनच्या २० टक्के वस्तू उध्वस्त झाल्या आणि चीनला संताप आला होता . चीनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार घालून आता चीनला चांगला धडा शिकवा . जगातील देशांमध्ये भारत देश खूप मोठा आहे. भारत देशाला आणखी मोठा करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करा . सर्व भारतीय नागरिकांनी संपूर्ण विश्वात " माझा भारत महान आहे " हा नारा देऊन जगाला भारताच महत्त्व पटवून द्या ! सध्याच्या काळात आम्ही भारतीय जगात कोणा पेक्षाही कमी नाही हे दाखवून देण्याची गरज आहे . घरीच रहा , सुरक्षित रहा , आणि आता कोरोना सोबत जगायला शिका !
-लक्ष्मण राजे
मीरा रोड पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा