" स्थलांतर "
आली कोरोना महामारी
झाली देशभरात टाळेबंदी
नाही हाताला काम
नाही खिशात दाम
नाही खायला पोटभर
प्यायला पाणी घोटभर
भरणार कशी खळगी पोटाची
निघाले मजुर , धरली वाट घराची
वृध्द , पोरं खांद्यावर
सामानाचे ओझे डोक्यावर
करीत आहेत मजुर
कुटुंबा सहित स्थलांतर
मिळेल ते पोटाला खाऊन
दिवस रात्र सदैव चालत
आज उद्या नाही तर परवा
शहरात उपाशी मरण्यापेक्षा
पायपीट करून मैलाचे अंतर
कापून गावाचे गाठण्यासाठी घर
एकच धाडसी जिद्द उराशी
कसे तरी पोहचू घरी दाराशी
लक्ष्मण राजे
मीरा रोड पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा