मुंबई (शांताराम गुडेकर )
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने ईशान्य मुंबईचे खासदार मनोजभाई कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका रजनी केनी फाउंडेशन सुमती ग्रुप मुलुंड यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर पार पडले.या रक्तदान शिबिरात ६३ बोटल्स रक्त जमा झाले. या शिबिरासाठी के.ई. एम. रुग्णालय, परेल यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.यामध्ये अमोल ढाईफुले,विजय कुलकर्णी यांच्यासह काही कार्यकर्ता यांनी सुद्धा रक्तदान करून... करुनी दान रक्ताचे, फेडुया ऋण समाजाचे हा संदेश दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा