मुंबई -(किशोर गावडे)
एकीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असताना मनपा "एस" विभागातील वेगवेगळ्या विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या नागरिकांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याचे, व्हिडिओ रोजच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे विलगीकरण कक्ष आहेत की छळछावण्या असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
"एस" विभागात कोरोनाची दहशत असताना, विलगीकरण कक्षातील नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे .
त्याप्रमाणे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागातील कोणकोण विलगीकरणात आहेत,? त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे केलेली आहे. ?त्यांना सर्व सोयी सुविधा मिळत आहेत का? त्यांच्या काही तक्रारी आहेत का? याची पूर्ण चौकशी करून त्यांची आत्मीयतेने माहिती घेण्याचे कष्ट घेणे गरजेचे आहे.
"एस" विभागातील कोरोना रुग्णांची संख्या 427 च्या पुढे पोहचली आहे .वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांचा अक्षरशा कोंडवाडा झाला आहे.प्रशासनाने covid-19 केअर सेंटर ,कोविड 19 हेल्थ सेंटरची दैनंदिन पाहणी करणे आवश्यक आहे. प्रशासन व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन अत्यावश्यक सेवा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. जर काही रुग्णांची लक्षणे सौम्य असतील तर, त्यांची वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. मात्र, कोरोना पासून नागरिक मुक्त व्हावेत,यासाठी असलेले हे विलगीकरण कक्ष छळछावण्या झाल्यात का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
कर्वेनगर एम एम आर डी ए, रुणवाल फॉरेस्ट, परिवार कांजुरमार्ग पूर्व , पवई हिरानंदानी व अन्य सेंटरमध्ये असलेल्या विलगीकरण केलेल्या नागरिकांकडून रोजच सोशल मीडियावर तेथील दुरावस्थेबाबत व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे व मनपा प्रशासन , तसेच आरोग्य विभाग जबाबदार म्हटले जाते. मनपा विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांची तेथील दुरवस्था दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. हे पालिकेचे रोजच धिंडवडे निघत आहेत. बेजबाबदार सहाय्यक आयुक्त यांच्या बेपर्वाईमुळे व प्रशासकीय यंत्रणेतील दिरंगाई व सावळागोंधळ यामुळेच ही परिस्थिती सत्य काही सांगून जाते. प्रत्येक नगरसेवकाने कोरोना संदर्भात आपल्या प्रभागातील जनतेला सामोरे जाऊन सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा