मुंबई (किशोर गावडे)
मुंबई मनपा 'एस' विभागाच्या कक्षेत कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने होत असून 5 दिवसांमध्ये 96 नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ,5 दिवसांत 1 जण दगावला असून, आतापर्यंत एकूण 10 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. तर 91 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 241 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे समजते.
रविवारी सायंकाळ पर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 427 वर पोहोचला असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एस विभागातील सर्व नगरसेवक आपआपल्या विभागात दक्ष झालेले दिसत आहेत.त्यामुळे राज्य शासनाची यंत्रणा, व आरोग्य विभाग, व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चांगला समन्वय झालेला दिसून आला.
मनपा "एस" विभागातील कोरोना बाधित रुग्णांचे आकडे पाहता गंभीर परिस्थिती हाताबाहेर जाते की काय? असे वाटायला लागलेय !
विशेषतः कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळताच मुंबई महापालिका व राज्य सरकार सावध झाले होते. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर – परिचारिकांसह अन्य कामगार युध्दपातळीवर काम करीत आहेत. कोरोनाचा रुग्ण आलाच तर तो बरा होऊनच घरी जातो, या उद्देशाने आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. तरीही दिवसागणिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे.
धारावी नंतर भांडुप हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतोय का? अशीही शंका व्यक्त केली जातेय. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता तर सगळेच हतबल झाले आहेत. आतापर्यंत 10 जण दगावले आहेत. पवई, विक्रोळी, भांडुप सोनापूर,मध्येही कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून , कोरोनाग्रस्तांचा आकडा 427 वर पोहोचला आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, संपूर्ण *एस* विभाग आता कोरोनाच्या विळख्यात सापडला असून मे अखेरपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा