पेण दि. ११ (अरविंद गुरव) - कोरोनो विषाणूच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांची अन्न-पाण्यासाठी शिकस्त सुरू असताना दुसरीकडे मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांची तडफड सुरू होती. शासनाने तिसरा लॉकडाऊन जाहीर करताना झोननुसार नियमात शिथिलता दिली. रायगड जिल्ह्यातील काही भागात ४२ दिवसांनंतर उघडलेल्या मद्यदुकानासमोर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडत असल्याचे रोजच दिसत आहे. दोन दिवसांनंतरही तळीरामांची गर्दी वाढतच असल्याचे चित्र दिसले. पेण तालुक्यालगत असलेल्या पनवेल, उरणमध्ये अद्याप मद्यविक्री बंद असल्याने या भागातील तळीरामांनी आपला मोर्चा पेणकडे वळविला आहे. काल आणि आज असे दोन दिवस पनवेल आणि उरण येथील काही तळीरामांना पेण मधून मद्य खरेदी करतांना पेण पोलिसांनी पकडले आहे.
या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यात बाहेरून येणार्यांना पायबंद बसावा यासाठी मद्य खरेदी करताना आधार कार्ड दाखविणे सक्तीचे करण्यात यावे अशी मागणी पेणकर करीत आहेत. त्यामुळे पेण तालुक्याच्या बाहेरील तळीरामांना पेणमध्ये दारु खरेदी करता येणार नाही. पण पेण तालुका आणि जिल्ह्याच्या सीमा बंद असूनही पेण तालुका आणि जिल्ह्याच्या बाहेरील तळीराम नागरिक पेणमध्ये कसा प्रवेश करतात हां प्रश्न सर्वांना पडला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा