आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ११ मे, २०२०

"एस"विभागाच्या कक्षेत येणा-या आरोग्य सेविकांना जीवनावश्यक किट द्या.

मुंबई -(किशोर गावडे)

       कोरोना संक्रमणाने संपूर्ण जगाला विळखा  घेतल्यावर  आपल्या देशात दाखल होताच मुंबईतील सर्व प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. मनपा प्रशासनाने आरोग्य सेवक ,आरोग्य सेविकांवर अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संकटातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या आरोग्य सेविका उतरलेल्या आहेत. त्यांची ही अविरत सेवा खूपच कौतुकास्पद आहे असे म्हणावे लागेल.
         आरोग्यसेविका कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची माहिती घेत आहेत. तसेच घरात कुणी आजारी व्यक्ती आहे का? अशा पद्धतीने तपासणी करण्याचे काम उन्हाची तमा न बाळगता करताना दिसतात. यासाठी त्यांच्या चांगल्या कामाचे प्रशासनाने कौतुक केले पाहिजे. त्यांना वेळोवेळी  सहकार्य मिळाले पाहिजे. आता तर या आरोग्य सेविकांना पॉझिटिव्ह पेशंटला  रुग्णालयात नेण्याचे काम दिले जातेय, अशी माहिती निदर्शनास येत आहे. तसेच  रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना  व्यक्तींना कोरंनटाईन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येत आहे.  लोकांचे  प्रबोधन करणे, पालिका प्रशासनाच्या सूचना जनतेपर्यंत मांडणे,अशी विविध कामे आरोग्यसेविका प्रमाणिकपणे करत असतात.अशा परिस्थितीत त्या कठीण काळात त्यांना  कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते.
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने
दिलेल्या सूचनांचे त्या पालन करतात. मात्र, या सर्व आरोग्य सेविका जबाबदारीने काम करत असताना ,त्यांच्या आरोग्याची काळजी मनपा प्रशासन घेत नाही असे दिसून येते. मनपा प्रशासनाने या सर्व आरोग्य सेविकांना जीवनावश्यक कीट देऊन त्यांच्या आरोग्याचे रक्षण करावे.अशी सुचना पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली असल्याचे कळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...