आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६

शहापूर तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील यांचे निधन

वासिंद(हर्षल शेलवले)-  शहापूर तालुक्यातील सहकार,राजकीय, सामाजिक,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले, मढ गावचे प्रगतशील शेतकरी तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ कृष्णाजी पाटील (वय ८० ) यांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
      पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या आयुष्यात सहकार चळवळीत मोलाचे योगदान दिले होते. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या कारगीर्दीत त्यांनी मढ ग्रामपंचायत सरपंचपद,खातिवली-वासिंद सेवा सहकारी सोसायटीचे चार वेळा चेअरमनपद,शहापूर तालुका खरेदी विक्री संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी कार्यरत होते.तसेच श्रीक्षेत्र गोजेश्वर ट्रस्टचे अध्यक्षपदी असताना त्यांनी या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी मोलाचे योगदान दिले.
       विशेष बाब म्हणजे राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या तालुक्यातील असंख्य राजकीय नेत्यांनी पाटील यांच्या मार्गदर्शनाने असंख्य पदे उपभोगल्याची प्रतिक्रिया जुनेजानते कार्यकर्ते सध्या व्यक्त करत आहेत.त्यांच्या निधनाने एक चांगल व्यक्तिमत्व हरपल त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस जिल्यातील सर्व स्तरावरील मान्यवर मंडळी तसेच नातलग व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठासंख्येनी उपस्थित होते.त्यांच्या निधनाने एक चांगल व्यक्तिमत्व हरपल त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुंबईत अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते ‘वर्तुळ’ दिवाळी अंकाचे दिमाखदार प्रकाशन

मुंबई( प्रतिनिधी)- साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणीवांचा सुंदर संगम असलेल्या ‘वर्तुळ दिवाळी अंक २०२६’ चे प्रकाशन रविवार, दिनां...