मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय (aclimning) उद्यान (SGNP) प्रशासनाच्या सहकार्याने व गिर्यारोहण क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या पुढाकाराने १ नोव्हेंबर पासून SGNP मध्ये नैसर्गिक प्रस्तरारोहण (Rock Climbing) सराव पुन्हा सुरू होत आहे.
सर्व गिर्यारोहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जबाबदार पद्धतीने सरावात सहभागी व्हावे, असे SGNP प्रशासनाने कळविले आहे. सहभागी होणा-या गिर्यारोहकांनी
SGNP चे नियमित प्रवेश तिकीट (Entry Ticket) काढणे अनिवार्य आहे. तसेच Climbing Practice Ticket प्रति व्यक्ती प्रति दिवस ₹१०० असेल. सध्या ही रक्कम तिकीट खिडकीजवळ आपल्या स्वयंसेवकांकडे जमा करावी व त्यांच्याकडे असलेल्या वहीत आपली नोंद करावी.
सरावास फक्त प्रत्येक रविवारी परवानगी असेल. प्रत्येक गिर्यारोहकाने त्यांना प्रदान केलेले SGNP Climber Registration Card सोबत बाळगणे आवश्यक आहे.प्रवेशाची वेळ सकाळी ८.०० ते १०.०० अशीच राहील. त्यानंतर दिवसभर सराव करता येईल.
प्रत्येकाने स्वतःची आवश्यक क्लायम्बिंग उपकरणे (Climbing Equipment) सोबत आणणे बंधनकारक आहे. ही कोणतीही व्यावसायिक (Commercial) उपक्रम नसून, गिर्यारोहण क्षेत्रातील सरावासाठी SGNP प्रशासनाने गिर्यारोहकांना उपलब्ध करून दिलेली विशेष सुविधा आहे. सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून, या उपक्रमाला यशस्वी बनवावे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
• सूरज मालुसरे – ९९३०३७५१९२
• कुणाल सुतार – ९८६९७७८२०२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा