या स्पर्धेत सुप्रिता सुबुद्धी हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आंतरराष्ट्रीय ज्युरी जितेश कदम यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर संस्कृती पवार हिने स्पर्धेत नववे स्थान मिळवले, तर १४ वर्षांखालील मुलींच्या पिस्तूल प्रकारात ज्ञानेश्वरी शिंदे हिने चौथे स्थान मिळवले.
या तिन्ही खेळाडूंनी उलवा, रायगड येथील इंडियन मॉडेल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सिद्धांत रायफल अँड पिस्तूल शूटिंग क्लबच्या रायगड रेंजवर नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना राष्ट्रीय नेमबाज किशन खारके, राष्ट्रीय नेमबाज व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अलंकार कोळी तसेच विश्वजीत सर यांचे मार्गदर्शन लाभले. सुप्रिता सुबुद्धी हिने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्यासह संस्कृती पवार आणि ज्ञानेश्वरी शिंदे यांच्या कामगिरीचेही कौतुक होत आहे. या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य व संचालक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा