मुंबई : " एक आई - वडील चार मुलांचा सांभाळ करू शकतात परंतु चार मुले एका आई -वडिलांचा सांभाळ करू शकत नाहीत. आज हे दुर्दैवाने जगाचे भयानक वास्तव आहे. म्हणूनच शासननाने स्वार्थी व अपराधी मुलांना धडा शिकवीण्या साठी, शासनाकडून कायदे बनवून सविधनात हमी देऊन मान्य केलेले आहे. ज्येष्ठाना सांभाळ न करणा -या पाल्याना तुरुंगावास अथवा दंड होऊ शकतो. "
१ ऑक्टोबर, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, म. रा., सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, मुंबई, व श्रीकृष्ण महिला बालकल्याण विकास मंडळ यांच्या सहाय्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, ऍड. प्रमोद ढोकळे, प्रमुख विधी सल्लागार, फेस्कॉन फेडरेशन ऑफ सिनिअर सिटीझन ऑफ महाराष्ट्र, हे ज्येष्ठाना मार्गदर्शन करताना केले.
संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघ, गोरेगाव (पूर्व )विरंगुळा केंद्रात कायदे विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी ऍड. प्रमोद ढोकळे, तसेच विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाचे, अध्यक्ष - दिलीप धारकर, सचिव - सूर्यकांत सोडये सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात, श्री गणेश वंदना व छ. शिवाजी महाराज यांच्या पूजनाने झाली. चार ज्येष्ठांनी, ज्येष्ठ नागरिक दिनांचे महत्व सांगितले. माहे सप्टेंबर मधील जन्म दिन असलेल्याचा ज्येष्ठाचा सन्मान यावेळी करण्यात आला. सर्वांना गुलाबचे फुले देऊन आनंद उत्सव करण्यात आला.
विरंगुळा चे अध्यक्ष - दिलीप धारकर यांचे हस्ते ऍड प्रमोद ढोकळे यांचा सत्कार करण्यात आला. खा. रवींद्र वायकर व माजी खासदार - गजानन कीर्तिकर, यांनी पाठविल्या शुभेच्छाचे वाचन करण्यात आले. दिंडोशी पोलीस ठाणे यांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक - अलका भोसले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष - दिलीप धारकर यांचा सल्लागार यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन- इंदू सिंह व शर्मिष्ठा कौलकर
यांनी केले. या वेळी संपूर्ण कार्यकारिणी सदस्य हजर होते. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने व आनंदात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा