आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

ऑन कॉल रक्तदाते संस्थेतर्फे राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) रक्तदान हे श्रेष्ठ दान राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त दरवर्षी एक ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या दिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या रक्तपेढीमध्ये ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात महिला रक्तदात्यांसहित एकूण सतरा रक्तदात्यांनी तसेच श्रुती सावंत व संदीप सावंत या उभयतांनी रक्तदान करून राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस साजरा केला.
      यावेळी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मीनल सावंत, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, संस्थेचे सदस्य मंगेश माणगावकर, प्रशांत निरवडेकर, अमोल परब, विजय सोनसुरकर, सौ श्रुती सावंत, संदीप सावंत तसेच रक्तपेढीचे प्रशांत सातार्डेकर, अनिल खाडे, रवीना लोहांबरे आणि रक्तदाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विशाल रेड्डी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक सौ मीनल सावंत यांनी केले तर आभार श्री बाबली गवंडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

भयपट शॉर्टफिल्म ‘शापित ग्रंथ’ प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण निसर्गसौंदर्य आणि जंगल यांचा वापर करून शूटिंग झालेला भयपट काल रात्री मुंबईत रिलीज झाला. ग्रामीण भागातील लोककथांचा व...