आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

दिबा नामकरण मुद्दा पुन्हा चर्चेत ; जासई येथे मोठी बैठक! आरपारची लढाई!!

मुंबई (सतिश पाटील ): ( जासई) उरण येथे आरपारची लढाई, लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर चळवळ सर्व पक्षीय बैठक नुकतीच आयोजित केली होती.यावेळी सर्व भुमिपुत्राचा चांगला, उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. अनेक मान्यवर व भूमिपुत्राचे सुचक असे मार्गदर्शन व सुचना मांडण्यात आल्या. किती वेळ सरकार च्या अश्वासनाची वाट बघायची ? २००८ पासून मागणी प्रलंबित आहे. अनेकदा मोर्चे, आंदोलन रॅली मूक मोर्चा साठी उपोषण धरणे तसेच ऑगस्ट महिन्यात थेट जंतर मंतर वर देखील मोर्चा काढून सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न भूमिपुत्रांनी केला पण हवा तसा प्रतिसाद सरकारकडून आजपर्यंत मिळाला नाही. फक्त राज्य सरकार व मुख्यमंत्री यांनी आम्ही आमच्याकडून हिरवा कंदील दिला असं जाहीर केले. पण केंद्र सरकारकडून जोपर्यंत मान्यता मिळत नाही तोपर्यंत नामकरण प्रस्ताव प्रलंबित व उपेक्षित आहे. तांत्रिक अडचण सांगितली जाते,अनेक पत्रव्यवहार झाले, उड्डाणं मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला.तसेच अनेक खासदारांनी नामकरणाचा मुद्दा सासंदेत उचलून धरला तरी देखील सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे असे एकंदरीत दिसून येत आहे. 
आता शेवटी आरपार ची लढाई म्हणून काही पुन्हा केंद्र सरकारची भेट घेऊन वेळ मागितली जाणार असे आजच्या बैठकीत मान्य करण्यात आले. त्या नंतर बाकी सर्वस्वी सरकार, प्रशासन जबाबदार असणार असे पवित्रा घेतला आहे. काही दिवस गावोगावी बैठक घेऊन जनजागृती मोहीम चालू केली जाणार आहे. पुढील बैठक लवकरच घेतली जाईल.या बैठकीला दिबा पाटील सर्व पक्षीय नामकरण कृती समितीचे अध्यक्ष  मा.दशरथ दादा पाटील यांची प्रकृती ठिक नसताना देखिल उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वरळीतील दिव्यांग बांधवाना दिवाळी सणानिमित्त टीशर्टचे वाटप

मुंबई (रवींद्र मालुसरे ) : मुंबई येथील महाराष्ट्रासह गोवा राज्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक सातत्याने कार्यरत असणाऱ्या मुंबई ये...