आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६

वरळीतील दिव्यांग बांधवाना दिवाळी सणानिमित्त टीशर्टचे वाटप

मुंबई (रवींद्र मालुसरे ) : मुंबई येथील महाराष्ट्रासह गोवा राज्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक सातत्याने कार्यरत असणाऱ्या मुंबई येथील शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने वरळी मुंबई येथील 'एनएसडी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड' (NSD Industrial Home for the Blind) मधील दिव्यांग बांधवाना दिवाळी सणापूर्वी टी-शर्ट्सचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जागतिक ख्यातीचे न्यूरो-स्पाइनल सर्जन आणि ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पी. एस. रमणी, मानद सचिव श्री. भूषण जॅक, अधीक्षक श्री. आनंद भुरे, वॉर्डन श्री. विवेक मोरे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष श्री. रवींद्र मालुसरे, श्री. गंगाराम विश्वकर्मा, शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य श्री. अजय कुमार भोसले, श्री. संजय कुलकर्णी, श्री. विनायक पंडित, श्री. दीपक देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
      याप्रसंगी आपल्या भाषणात डॉ. रामाणी म्हणाले की, या संस्थेशी त्यांचा दीर्घकाळचा संबंध आहे. मी लिहिलेले "ताठ कणा" हे पुस्तक मी ब्रेल लिपीमध्ये अनुवादित करून तुमच्यासाठी वाचनार्थ यापूर्वीच पाठविले आहे. आमची संस्था नेहमीच ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम पार पाडीत असते. आज अंध बांधवांसाठी टीशर्टचे वाटप करून या उपक्रमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याबरोबरच त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे, त्यांचा सन्मान राखणे आणि सणांचा आनंद सर्वांसोबत साजरा करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे रवींद्र मालुसरे यांनी कौतुक केले तर .दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अजयकुमार भोसले यांनी 'शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट'चे आभार मानले. श्री. भूषण जाक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि संस्थेने कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व सदस्यांचे आणि शेकडो अंध बांधवांचे आभार मानले. यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे हर्नियाचे ऑपरेशन थांबले होते अशा रोहिदास कांबळे या दिव्यांग युवकाला संस्थेच्या वतीने तात्काळ पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली.  

-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वरळीतील दिव्यांग बांधवाना दिवाळी सणानिमित्त टीशर्टचे वाटप

मुंबई (रवींद्र मालुसरे ) : मुंबई येथील महाराष्ट्रासह गोवा राज्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक सातत्याने कार्यरत असणाऱ्या मुंबई ये...