आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

जांभे येथे तरुणाईचा अनोखा दसरा उत्सव: शंभर दिव्यांनी उजळला 'नाथ', जपली शेतकरी परंपरा

वासिंद (हर्षल शेलवले):  शहरात डीजे आणि मोठ्या ढोल ताशांच्या गजरात दसरा साजरा होत असताना, जांभे गावातील तरुणाईने आपली मातीची परंपरा जपत एक आगळा-वेगळा दसरा साजरा केला. गावच्या तरुणांनी एकत्र येत पारंपारिक शेती अवजार ची मनोभावे पूजा करून दसरा साजरा केला.
    रात्रीच्या वेळी गावातील तरुणांनी 'नाथा'वर तब्बल शंभरहून अधिक मेणबत्त्या लावून त्याला दिव्यांच्या रोषणाईने सजवले. बैलगाडाप्रेमी केतन चन्ने यांच्या हस्ते विधिवत पूजा, हार अर्पण आणि आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व तरुणांनी एकत्र येऊन फोटो सेशन करत हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला.
यावेळी या तरुणाईच्या मनात एकच होत की, "हल्ली शेती आणि शेतकरी विसरला जात आहे. आमचे वडील ज्या नाथाने शेती करायचे, त्याच नाथाची पूजा करणे म्हणजे आमच्या बापजाद्यांचा सन्मान आहे. हेच आमचे मागणे - माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हा संदेश आम्हाला द्यायचा आहे."
      या उपक्रमात केतन चन्ने,नकुल शेलवले, मयूर वेखंडे यांसह मित्रपरिवारातील असंख्य तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला. गावातील ज्येष्ठांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, सोशल मीडियावर हॅप्पी दसरा या कॅप्शनसह हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
         परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधत जांभे गावच्या तरुणांनी दसऱ्याचा खरा अर्थ - विजय आणि कृतज्ञतेने जपला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

रत्ने शोधणारे हात, आनंदाश्रू फुलवणारी माणसे आणि विचारांना दिशा देणारे व्यासपीठ!

‘लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान’चा राज्यस्तरीय गुणगौरव सन्मान सोहळा !! ठाणे :  रविवार, दि.१८ ऑक्टोबर २०२६ रोजी   वक्रतुंड सभ...