गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर गडब गावातील निसर्ग सानिध्य लाभलेल्या उंच टेकडीवर नवसाला पावणाऱ्या श्री कालंबा देवी मातेचे जागृत देवस्थान आहे. या देवीच्या स्थानाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी कळंब नावाच्या राक्षासने संपूर्ण कोकणात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ऋषीमुनींनी होम यज्ञ करुन आदीशक्तीची आराधना केली. त्यानुसार देवीने प्रकट होउन कळंब राक्षसाचा वध केला व ती विसावा घेण्यासाठी तेथे थांबली. त्यानंतर त्या गावातील पाटील बंधूंना देवीच्या रुपातील एक स्वयंभु शिळा सापडली, त्या शिळेची त्यांनी पूजा अर्चा करून त्याच ठिकाणी तिची प्रतिष्ठापना करून तेथे छोटे मंदिर उभारण्यात आले. ती ही काळंबा देवी माता,सन १९४४ साली गडब येथे प्लेगची साथ आली. ग्रामस्थांनी देवीची मनोभावे सेवा केल्याने ग्रामस्थांना प्लेगच्या साथीपासून तारले, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. गडब हे दाट लोकवस्तीचे गाव असून, सरकारी कागदोपत्री काराव या नावाने ते ओळखले जाते. या आराध्य दैवतांवर गावांतील ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. या परंपरेनुसार काळंबादेवीचे दर्शन घेउनच मग कुठल्याही कामास सुरुवात करण्यास ग्रामस्थांची प्रथा आहे .
देवीचे दर्शन घेल्यानंतर आरंभलेल्या कामात यश मिळते अशी श्रद्धा ग्रामस्थांच्या मनात रुजलेली आहे.
नवरात्रोत्सवात भावीकांची अलौट गर्दी पहायला मिळते. तसेच संपूर्ण रायगड ठाणे कल्याण महाड मानगावर खालापुर कर्जत अशा अनेक ठिकाणाहून नवसाला पावणाऱ्या आई काळंबादेवीच्या दर्शनासाठी अलौट गर्दी पहायला मिळते.
गडब काराव काळबादेवी ग्रामस्थ मोठ्या भावभक्ती ने येणाऱ्या भावीक भक्तांचे स्वागत करून सर्व भाविकांची नास्तासाची सोय करतात .
दर नवरात्रीला अनेक नाच मंडळ यांचे पारंपारिक नृत्य होतात तसेच सातव्या माळेला वेशभूषा आणि पारंपारिक दांडी नृत्याच आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे नवव्या माळीला होम हवन करून मोठ्या संख्येने भावे दर्शनासाठी जमतात. तसेच रात्री कीर्तन सोहळा करून दसऱ्याच्या दिवशी महाप्रसादाची सोय काळंबा देवी मंदिरात केली जाते व सायंकाळी आईची पालखी सजवून मोठ्या थाटामाटाने मिरवणूक काढली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा