पेण ( प्रतिनिधी ):- कुंभार आळी, पेण-रायगड येथील सुप्रसिद्ध "शैक्षणिक संशोधक-कवी- लेखक-संपादक- समुपदेशक, निसर्गोपचार तज्ज्ञ हिलर प्रा.रवींद्र रा. म्हात्रे यांना "निसर्गोपचार गौरव सन्मान 2026" ने गौरविण्यात आले
आयुष इंटर नॅशनल असोशिएशन आणि ए.जी.एम.ए. व योगा निसर्गोपचार चिकित्सक असोशिएशन च्या वतीने देण्यात येणारा व अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार मोठ्या थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दि.4 ऑक्टोबर रोजी भ्रातृ मंडळ हाॅल, बुलडाणा येथे त्यांना प्रदान करण्यात आला.
यासन्मान सोहळ्याला महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ज्ञ मोठ्यासंखेने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये बुलडाणा मतदार संघातील लोकप्रिय आमदार संजय गायकवाड, बुलडाणा नगर पालिका नगराध्यक्षा सौ.पूजाताई गायकवाड, डाॅ.सचिन सुपे, डाॅ.त्रिदीप गुहा, प्रा. डाॅ. प्रशांत कपले, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर. एम.जी.एम. विद्यापीठाचे योगा विभागप्रमुख गंगाप्रसाद खरात, तर मंचावर प्रमुख उपस्थितीमध्ये आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोशिएशन चे व्हाईस चेअरमन डाॅ.नितीनराजे पाटील, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोशिएशन राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. बाबुराव कानडे, सौ. दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत,सौ.स्मिता खारकर, राहुल देशमुख, आशिष सुर्यवंशी व इतर आयुष इंटरनॅशनल असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
सन्माननीय निसर्गोपचार तज्ज्ञ लेखक-हिलर- रवींद्र रा.म्हात्रे तथा प्रा.भाऊ म्हात्रे यांना " निसर्गोपचार गौरव सन्मान 2026" मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून हिलर प्रा. भाऊ यांचे कौतुक होत आहे.त्यांनी निसर्गोपचार आरोग्य क्षेत्रात 16 वर्षे केलेल्या उल्लेखनीय कार्याचा हा गौरव आहे. असे सभास्थानी असलेल्या मान्यवरांनी जाहिर केले.
आजपर्यंत हिलर प्रा.भाऊ म्हात्रे यांनी अंदाजे 6000चे वरील दीन नारायणांना (रूग्णांना) व्याधीमुक्त केलेले आहे. विशेष म्हणजे
"आरोग्याची गुरूकिल्ली" ही आरोग्यवर्धक छोटी पुस्तिका संकलित करून अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडला आहे.शारीरिक व मानसिक असंतुलन झालेल्या सदस्यांना काही क्षणात दाब चिकित्से द्वारे उपचार करून दुःख मुक्त केले आहे. कित्येकांची पाठदुखी, मानदुखी, गुडगेदुखी साठीची शस्त्रक्रीया वाचवली आहे. तेही रूग्णांना कोणतीही औषधे न देता.
"चैतन्य गगनगिरी महाराज आश्रम, मनोरी, येथील भक्तांना विनामोबदला दुःखमुक्त केले आहे व करीत आहेत.आज त्यांच्यावर अनेक रूग्ण, परिचित, मित्रपरिवार, अभिनंदनाद्वारे सकारात्मक आशीर्वादाचा वर्षाव करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा