आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना,दादर पश्चिम रेल्वे येथे नवीन हमाल युनिटची स्थापना

मुंबई ( उदय वाघवणकर) -मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार व अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या सूचनेनुसार दादर पश्चिम रेल्वे येथे नवीन हमाल युनिटची स्थापना करण्यात आली.या नवीन युनिटच्या युनियन फलकाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस विवेक परब यांच्या हस्ते बुधवार, दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले
     या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित हमाल युनिटच्या बांधवांना युनियनचे कामकाज, कामगारांचे प्रश्न आणि संघटनेची पुढील वाटचाल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच सर्व नवनियुक्त युनिट पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

आदर्श वार्ताहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना,दादर पश्चिम रेल्वे येथे नवीन हमाल युनिटची स्थापना

मुंबई ( उदय वाघवणकर) -मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार व अध्यक्ष जितेंद्र पाटील...