आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

हौशी बालकलाकारांनी बनवल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या!

मुंबई (सतिश पाटील): बाल कलाकरांसाठी एकदिवशीय गणपती मूर्ती कार्यशाळा नक्कीच सहभागी होवून आपल्या आवडत्या बाप्पाची मुर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घ्या! आपणास शाडुची माती मोफत दिली जाणार! इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा! एका मेसेज वर हौशी कलाकार तयार   झाले.कुठेच बॅनरबाजी न करता मिळालेला उत्तम प्रतिसाद पुढील वेळी सर्वांसाठी मोठी कार्यशाळा भरवण्याचा मानस!
पत्ता :गणेश कला मंदिर 
प्रो. सचिन रणदिवे, कालिका अपार्टमेंट 
नाहूरगाव, मुलुंड (प) नेहरू रोड,मुंबई -80
   प्रथमच वर्ष आणि एका दिवसात ठरवले
 दुसऱ्या दिवशी नऊ बालकलाकार हजर झाले. दोन तासात सचिन रणदिवे गणेश कला मंदिरचे मालक यांनी थोडं मुलांना मार्गदर्शन केले.आसन कसे घ्यावे आणि मुलांनी आपल्या मनातील बाप्पा दोन तासात साकार केले.कोणतेही प्रशिक्षण व अनुभव नसताना मुलांनी पहिल्याच प्रयत्नात मूर्ती बनवण्याचे धाडस केले. याबद्दल परिसरात कौतुकाची थाप मिळत आहे.दुसऱ्या दिवशी यथाशक्ती बनवलेल्या मुर्त्या रंगवल्या आणि आपआपल्या घरी घेऊन गेले. 
      प्रो. श्री.सचिन रणदिवे यांनी शाडूची माती व रंग तसेच जागा उपलब्ध करून दिली. तसेच श्री सतिश पाटील,पत्रकार व सौ. भावना राजावाधा यांनी मोलाचे सहकार्य केले.
    उद्देश : पर्यावरण पुरक शाडूच्या मातीचे गणेश मुर्ती बनवा आणि प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या टाळा जेणेकरून पर्यावरण पाणी दूषित होऊन जलचर प्राणी, मासे यांना हानी होणार नाही. प्लास्टर च्या मुर्त्या विरघळण्यासाठी भरपूर कालावधी लागतो तोपर्यंत विसर्जन केलेल्या मुर्त्या भरती मुळे किनाऱ्याला येतात आणि विटंबना होते. पण शाडूच्या मुर्त्या लवकर पाण्यात विरघळतात. ती माती झाडांना घालू शकता.रंगही पाण्याचे वापरत आणावे अशी विनंती सर्व गणेश भक्तांना करण्यात येत आहे. आपणास सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

धगधगती मुंबई परिवारातर्फे आरती संग्रहाचे प्रकाशन

मुंबई : धगधगती मुंबई वृत्तपत्र परिवारातर्फे यंदाही गणेशभक्तांसाठी आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. महाराष्ट्र बाजार पेठेचे अध्य...