मुंबई (प्रतिनिधी )-आपण नेहमी एक म्हण ऐकतो. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात स्वतःच्या शरीराकडे म्हणजेच आरोग्याकडे सामान्यांचे दुर्लक्ष होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर आरोग्य चांगले नसेल तर कोणत्याही प्रकारची संपत्ती आपले आरोग्य वाचवू शकत नाही.
व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रात दाखल असलेल्या व्यक्तींचे देखील व्यसनाधीनतेमुळे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यानंतर शारीरिक दुखणी समोर येतात. अशा व्यक्तींना देखील चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. या उद्देशाने मिरॅकल फाउंडेशन मुंबई (व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र) आणि विवान हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्वसन केंद्रात आरोग्य शिबिर भरविण्यात आले होते. या शिबिरात प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजन पातळी, रक्तदाब, आवश्यक रक्त चाचणी व आवश्यक असलेल्या व्यक्तींची ईसीजी देखील काढण्यात आली. निरोगी शरीर आणि आनंदी मन हीच आपल्या जीवनाची खरी सुरुवात आहे. यासाठीच व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. हा संकल्प यावेळी घेण्यात आला.
या आरोग्य शिबिरासाठी विवान हॉस्पिटलचे डॉ. आय. के. सिंग यांच्यासह वैद्यकीय पथक, परिचारिका व स्वयंसेवक उपस्थित होते. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राचे संस्थापक, अध्यक्ष सुभाषचंद्र (बाबूजी) मनराय, खजिनदार विराज मनराज, केंद्रप्रमुख संतोष मनबोली आणि पंकज कौरा समन्वयक रमेश सांगळे यांच्यासह संपूर्ण स्टाफ यांनी विशेष मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा