आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

दिमाखदार असा गिरगावच्या राजाचा मुखदर्शन सोहळा संपन्न !!

मुंबई  (विलास देवळेकर): नुकताच गिरगावात, गिरगावच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडला. लहान मुलांचेही छोटंसं नाटुकले सादर करण्यात आले. गिरगावच्या राजाचे अध्यक्ष प्रकाश कनवजे, सेक्रेटरी गणेश लिंगायत, खजिनदार संकेत मालगुंडकर यांचा सत्कार फिल्म सेन्सर बोर्ड सदस्य श्री विलासराव खानोलकर व एक्झिक्युटिव्ह एडिटर अमर खानोलकर यांच्या शुभहस्ते "छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा- शाल- श्रीफळ" देऊन करण्यात आले. १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विनामूल्य मेडिकल कँपची उद्घोषणा याप्रसंगी करण्यात आली. सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने येऊन, या समाज सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिळकांचा गणेशोत्सव की दिखाव्याचा महोत्सव?

   गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर महाराष्ट्राच्या घराघरांत उत्साह संचारतो. आरास सुरू होते, मोदकांचा सुगंध दरवळतो, ढोल ताशांचा नाद घुमू लागतो ...